Sunday, May 5, 2024
Homeनाशिक‘त्या’ कुटुंबाला नगररचना विभागाची नोटीस

‘त्या’ कुटुंबाला नगररचना विभागाची नोटीस

नवीन नाशिक । प्रतिनिधी

मागील वर्षी विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नवीन नाशिक परिसरातील शिवपुरी चौकात विद्युत तारेचा शॉक लागून केदार कुटुंबातील आजी, आई व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच केदार कुटुंबाला नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाकडून सदर घराचे बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस पाठविण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून केदार कुटुंबियांनी आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते दरम्यान शिवपुरी चौकात राहणारे केदार यांच्या घराजवळील जादा दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील आई, आजी व मुलीचा करूण अंत झाला होता, तर मुलगा शुभम् केदार सुदैवाने बचावला परंतु त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले. त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. यावेळी काही राजकीय कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी केदार कुटुंबीयांना मदत मिळावी याकरता आंदोलने केले खरे परंतु त्यास फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही.

मात्र आता महापालिकेच्या नगररचना विभागाकडून केदार कुटुंबाला संबंधित घराचे बांधकाम अनधिकृत असून ते अतिक्रमण पाडण्याची नोटीस आल्याने केदार कुटुंबाच्या अडचणीत भर पडली आहे. शहरासह नवीन नाशिक परिसरात अनेकांनी मोठमोठे अतिक्रमण केल्याचे दिसून येत असताना व केदार कुटुंबीयांना आर्थिक मदत करायची सोडून त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून अतिक्रमण काढण्याची नोटीस का बजावण्यात आली असा प्रश्न नवीन नाशिककरांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या