Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्याच्या सीमाभागात पोलिसांकडून तपासणी

नाशिक जिल्ह्याच्या सीमाभागात पोलिसांकडून तपासणी

नाशिक  | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात सुमारे ४७ चेकपोस्ट निर्माण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे आज सांगितले. प्रत्येक चेकपोस्टवर ८ तासांसाठी रोटेशन पद्धतीने ३ टीम तयार करण्यात आल्या आहेत, त्यात संबंधित मंडळातील तलाठी,पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागाचा कर्मचारी, शिक्षक यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

पथकाला पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनीटायझर, शेड, पाणी, वैद्यकीय साधने, सुविधा अशी व्यवस्था करण्यात यावी. तपासणी केलेल्या वाहनांची, नागरिकांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवण्यात यावी. तहसीलदार, विस्तार अधिकारी यांचे एक भरारी पथक नेमावे आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकांची सेवा घ्यावी अशी सूचना मांढरे यांनी केली आहे.

शिंदे टोलनाका येथून मध्यरात्रीपासून पुणे पसिंगच्या शेकडो कार्स व अन्य वाहने नाशिकमध्ये दाखल. पुण्याकडून येणाऱ्या वाहनांची संख्या काळजी वाढवणारी आहे, पुण्यात स्थायिक असणारे बाहेर पडत आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेसवे बंद केल्याने नाशिक मार्गे वाहनांची गर्दी वाढली असल्याचे सांगितले जात आहे.

असे असतील जिल्ह्यातील
कोरोना चेकपोस्ट

नाशिक

पाथर्डी, शिंदे, दसक, आडगाव म्हसरूळ, पिंपळगाव बाहुला, गंगापूर

दिंडोरी
जानोरी विमानतळ, वणी चौफुली, पेठ : गुजरात इंटरस्टेट बोर्डर (राजबारी),

कळवण

गुजरात सीमेसाठी जिरवाडे, नाशिकसाठी नंदुरी सुरगाणा : उंबरनाथ, बोरगाव

सटाणा / बागलाण

नाशिक पुण्यासाठी ठेंगोडा, नंदुरबारसाठी दसवेल, मालेगावसाठी लखमापूर

मालेगाव

झोडगे, साकुर फाटा, डोंगराळे

चांदवड

खेलदरी (जुना देवळा रोड टोल नाका ) नाशिककडे, चांदवड टोल नाका नाशिकच्या दिशेने, शिंगवे नाका( मनमाड ते चांदवड प्रवाशांसाठी) देवळा : शहरात प्रवेश करताना, पिंपळगाव -जलाल टोल नाका, गावंडगाव,येवला रेल्वे स्थानक नांदगाव: नायडोंगरी,अमोदे,कासारी, बोलठाण, मनमाड रेल्वे स्टेशन

निफाड

चांदोरी त्रिभुली, पिंपळगाव टोलप्लाझा, दहावा मैल-ओझर,विंचूर चौफुली सिन्नर : वावी, नांदूर शिंगोटे, पांढूर्ली

इगतपुरी

इगतपुरी रेल्वे स्टेशन, घोटी टोल नाका, पिंपळगाव मोर अकोले भाग त्र्यंबक: १ पैना; पालघरसाठी, आंबोली; जव्हार रोडसाठी, हर्सूल; दमण सीमेसाठी.

- Advertisment -

ताज्या बातम्या