Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना : भुकेपोटी अकराशे कि.मी सायकलवर प्रवास

कोरोना : भुकेपोटी अकराशे कि.मी सायकलवर प्रवास

शहरात पंतनगर परिसरात राहत असलेल्या बुड्डी के बाल व कुल्फी विकुन पोटाची खळगी भरणाऱ्या उत्तर प्रदेशमधील चौघा कुटुंबियावर कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने व  खिशातील पैसेही नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने या कुटुंबियांनी अकराशे किलोमीटर सायकल ने उत्तर प्रदेश कडे जाण्यासाठी निघाले .
हि माहिती नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळांना मिळताच त्यांनी सहकारी नगरसेवक प्रमोद दादा अवसरमोल, अनिल गांधी,आरोग्य निरीक्षक योगेश घुगे, निखिल चिम यांचेसह पंतनगर गाठले त्या कुटुंबियांचे मन वळवून त्यांना 15 दिवस पुरेल असा धान्य साठा दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पंतनगर स्थित राहणारे मुळ रा.बदलेपुर्वा जि.कन्नौड, उत्तर प्रदेश मधील कैलास गुप्ता, शिवाजी कुमार, फुलचंद साहाय्य यांचे कुटुंब शहरात बुड्डी के बाल व कुल्फी विकुन पोटाची खळगी भरत बारा तेरा जणांचा गाडा हाकतात कोरोनामुळे शहरात लाकडाॅऊन असल्याने व त्यांचा व्यवसायही बंद असल्याने खिशातील पैसे संपले असून त्यांच्या कुटुंबीयांवर आता उपासमारीची वेळ आली गावाकडे जाण्यासाठी खिशात पैसे नसल्याने या कुटुंबीयांनी सायकलिंग अकराशे किलोमीटर जाण्याचा निर्णय घेतला.
याबाबतची माहिती रावळ यांना मिळताच त्यांनी सहकारी नगरसेवकां समवेत या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना जिल्हाबंदी असल्याने कुठेही जाता येणार नाही व अकराशे किमी प्रवास करताना साधारणतः आठ ते दहा दिवस लागणार असुन हा जिवघेणा प्रवास टाळण्यास परावृत्त केले .
या कुटुंबियांना रावळ यांनी पंधरा दिवस पुरेल असे खाण्या उपयोग्य अन्नधान्य दिल्याने त्या कुटुंबियांनी तो प्रवास रद्द करत नगराध्यक्ष अॅड रावळ व सहकारी नगरसेवकांचे आभार मानले.
- Advertisment -

ताज्या बातम्या