Sunday, May 5, 2024
Homeनगर…तर ‘त्या’ शाळांवर कारवाई – वर्षा गायकवाड

…तर ‘त्या’ शाळांवर कारवाई – वर्षा गायकवाड

पुणे – राज्यातील काही शाळांकडून पालकांकडे शाळा सुरु होण्याआधीच शुल्काची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा शाळांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना दिले आहेत. दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी याआधीच शालेय पोषण आहार योजनेअतंर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण करण्याबाबतही आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या