Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रखासगी रुग्णालयांनी सेवा बंद करणे अयोग्यच; 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनबाबत‘हा’ विचार -आरोग्य मंत्री

खासगी रुग्णालयांनी सेवा बंद करणे अयोग्यच; 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनबाबत‘हा’ विचार -आरोग्य मंत्री

मुंबई – राज्यातील खासगी रुग्णालयांनी पूर्णपणे सेवा बंद करणे अयोग्यच आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आतापर्यंत 9 लाख लोकांना शोधलं आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत कंटेन्मेंट झोनच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहोत. त्यांना तुम्ही सहकार्य कराल, मदत कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असंही ते म्हणाले. लॉकडाऊन लागू केला आहे. पण 14 एप्रिलनंतर काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. काही प्रमाणात ढिलाई देता येईल का? याबाबत विचार सुरू आहे. पण हे आपण सगळ्यांनी स्वयंशिस्त पाळली तरच शक्य आहे, असंही ते म्हणाले.

टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील सद्यपरिस्थितीबाबत माहिती दिली. राज्यातील 9 लाख लोकांचं ट्रेसिंग केलं आहे. त्यासाठी पथकं तयार केली आहेत. मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी कंटेन्मेंट झोनच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जात आहे. आरोग्य सेवक काम करत आहेत. त्यांना तुम्ही सहकार्य करा, मदत करा असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं.

- Advertisement -

आरोग्य संसाधनं कमी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण 25 हजार पीपीई किट्स आणि अडीच लाखांहून अधिक मास्कही उपलब्ध आहेत. तुटवडा जाणवल्यास केंद्र सरकार उपकरणे पुरवणार आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍यांनाच एन 95 मास्क आणि किट्स देण्यात येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात लवकरच आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

स्वयंशिस्त पाळा – लॉकडाऊन लागू केलं आहे. आता 14 एप्रिलनंतर काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पण या तारखेनंतर काही प्रमाणात ढिलाई देता येईल का, असा विचार सुरू आहे. पण आपण शिस्त पाळली तरच हे शक्य होईल. आपल्याला स्वयंशिस्त पाळायला हवी. मी कोरोनाला हरवणारच. मीच माझा रक्षक या विचाराशी कटिबद्ध राहून काम करावं लागेल, असंही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या