Sunday, May 5, 2024
Homeनगरआश्वी : कोरोना बाधीत व्यक्तींच्या कुटुंबियांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह

आश्वी : कोरोना बाधीत व्यक्तींच्या कुटुंबियांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह

आश्वी (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे गुरुवारी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे या रुग्णाच्या घरातील 15 लोकांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडून पाठवण्यात आले होते. शनिवारी या सर्व 15 लोकांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

गुरुवारी आश्वी बुद्रुक येथे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्याने परिसर पुर्णतः पोलिसांनी बंद केला असून आरोग्य विभागाचे कर्मचारी याठिकाणी लक्ष ठेवून आहेत. बाधित रुग्णाच्या कुटुंबातील 15 जणाचे अहवाल निगेेटीव्ह आले असून या सर्वांना संगमनेर येथिल रुग्णालयात 14 दिवसासाठी ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. दरम्यान आश्वी परिसरात रुग्ण आढळल्याने पुर्णत: लॉकडाऊन करण्यात आले असून शनिवारी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आणखी 5 जणांना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

तर शनिवारी गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप, डॉ. तय्यब तांबोळी, दीपक महाजन, डॉ. मदने, आरोग्य कर्मचारी विकास सोनवणे, आशा सेविका, स्थानिक सरपंच व सदस्यासह वैद्यकीय पथकाने ठिकठिकाणी जाऊन पाहणी करत माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या आहेत. तसेच आश्वीचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व त्याचे सर्व सहकारी हे वेळोवेळी परिसरातील गावांमध्ये गस्त घालून 100 टक्के लॉकडाऊनसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या