Friday, May 3, 2024
Homeनगरपरदेशी नागरिकाचा 14 दिवसानंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह

परदेशी नागरिकाचा 14 दिवसानंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह

नेवासा येथील 24, नगर शहर 6, राहाता 3, पाथर्डी तालुक्यातील 3, राहुरी 2, कोपरगाव येथील 4 तर अकोले, संगमनेर, कर्जत येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर (प्रतिनिधी)– जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी 56 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, कोरोना बाधीत असणार्‍या आयवरी कोस्ट येथील परेदशी नागरिकांचा 14 दिवसानंतरचा दुसरा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.
बुधवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त अहवालामध्ये नेवासा येथील 24, श्रीरामपूर येथील 11, नगर शहर 6, राहाता 3, पाथर्डी तालुक्यातील 3, राहुरी 2, कोपरगाव येथील 4 तर अकोले, संगमनेर, कर्जत येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यासह अद्याप 22 अहवाल प्रलंबित असून कोरोना बाधीत फ्रान्स येथील परदेशी नागरिकाचा 14 दिवसा नंतरचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी दिली.
मात्र, कोरोना बाधीत असणार्‍या आयवरी कोस्ट येथील परेदशी नागरिकांचा 14 दिवसानंतरचा दुसरा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला असल्याने आरोग्य विभागाची चिंता मात्र कमी झालेली नाही.
- Advertisment -

ताज्या बातम्या