Sunday, May 5, 2024
Homeनाशिकनाशिकमध्येच तपासले जाणार स्वॅब नमुने; डाॅ. पवार वैदयकिय महाविद्यालयात लॅब

नाशिकमध्येच तपासले जाणार स्वॅब नमुने; डाॅ. पवार वैदयकिय महाविद्यालयात लॅब

एक आठवडयात उभारणी

नाशिक । प्रतिनिधी

करोना संशयित रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पुणे व धुळे येथील प्रयोगशाळेत पाठवले जात असून अहवालप्राप्त होण्यास विलंब होत आहे. ते बघता दातार जनेटिक्स व अपोलो हाॅस्पिटलने स्वॅब चाचणीसाठी त्यांच्याकडील कीट व यंत्रसामुग्री मविप्रच्या डाॅ. वसंतराव पवार वैदयकिय महाविद्यालयाला उपलब्ध करुन दिली आहे.

- Advertisement -

लॅब उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून नाशिकमधील रुग्णांच्या स्वॅबची डाॅ.पवार वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हयात मालेगाव करोनाचे हाॅटस्पाॅट ठरले असून करोना बाधित रुग्णांची संख्या पन्नासच्या उंबरठयावर पोहचली आहे. रोज ५० ते ६० संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे व धुळे येथील वैदयकिय महाविद्यालयातील लॅबमध्ये पाठवले जात आहेत. या ठिकाणि इतर जिल्ह्यातुनही नमुने तपासणीसाठी येतात.

त्यामुळे नाशिकमधील रुग्णांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच स्वॅब तपासणी लॅब सुरु व्हावी यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हा प्रशासन प्रयत्नशील होते. या प्रयत्नांना यश आले असून डाॅ.वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयातील लॅबमधील स्वॅब पतपासणीचा मार्ग मोकळा झाला अाहे.

आरोग्य मंत्रालयाने त्यास मान्यता दिली आहे. शहरातील दातार जनेटिक्स व अपोलो हाॅस्पिटलने स्वॅब तपासणीचे कीट व यंत्र मोफत उपलब्ध करुन दिले आहे. उपजिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या टिमने डाॅ.पवार वैद्यकिय महाविद्यालयात लॅब उभारणीचे काम सुरु केले आहे. डाॅ.पवार वैद्यकीय महाविद्यालय व दातार जनेटिक्सचे तज्ज्ञ डाॅक्टरांचे पथक नागपुरमधील एम्समध्ये स्वॅब नमुने तपासणीचे प्रशिक्षण घेत आहेत. नाशिकमध्ये लॅब उभारणी पूर्ण झाल्यावर ते स्वॅब तपासणीचे काम सुरु करतील.

दिवसाला अडीच लाख खर्च

अद्यावत लॅबमध्ये रियल टाईम मशीन, पीसीआर मशीन, वाताणुकुलित कक्ष, मायनस ४० ते ८० तापमानाची क्षमता असणारे चार मोठे रेफ्रिजिरेटरची असा सेटाअप असणार आहे. त्यासाठी दहा लाख रुपये खर्च आला. या लॅबमध्ये दिवसाला दिडशे स्वॅब तपासणी होऊ शकते. एका चाचणीसाठी दीड हजार रुपये खर्च आहे. ते बघता दिवसाला अडिचलाख इतका खर्च येणार आहे.

डाॅ. पवार वैद्यकिय महाविद्यालयाला भेट देऊन लॅबची पाहणी केली. ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. डाॅक्टरांचे पथक नागपूरहुन प्रशिक्षण घेऊन आल्यावर लॅबमध्ये टेस्टिंग सुरु केले जाईल. जेणेकरुन तत्काळ करोनाचे निदान होण्यास मदत होईल.

– आ.नरहरी झिरवाळ, उपसभापती

महापालिका आयुक्तांनी लॅब उभारणीला परवानगी दिली आहे. दातार जनेटिक्सकडून यंत्रसामुग्री उपलब्ध झाली आहे. डाॅक्टरांचे पथक नागपुरला प्रशिक्षण घेत आहे. लवकरच डाॅ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयातील लॅबमध्ये स्वॅब चाचणीला सुरुवात होईल.

– डाॅ.नीलीमा पवार, सरचिटणीस, मविप्र

लॅब उभारणीसाठी दातार जनेटिक्स व अपोलो हाॅस्पिटलने सेटअप दिला. डाॅ.पवार वैद्यकिय महाविद्यालयाच्या डीन डाॅ.मृणाल पाटील व दातार जनेटिक्सचे दादासाहेब अकोलकर यांनी लॅब उभारणीत सहकार्य केले. आमदार झिरवाळ यांनी त्यांच्यातर्फे दोन रेफ्रिजिरेटर दिले आहे.

– कुमार आशिर्वाद, उपजिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या