Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव : कोरोना संशयित महिलेचा मृत्यू ; पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील कोरोना संशयित...

जळगाव : कोरोना संशयित महिलेचा मृत्यू ; पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील कोरोना संशयित १७ रुग्ण दाखल

जळगाव | प्रतिनिधी

अमळने येथील एका ५२ वर्षीय कोरोना संशयित महिला रुग्णाचा रविवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेस न्युमोनिया व श्‍वसनाचा अधिक त्रास होता. या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

- Advertisement -

अमळनेर तालुक्यातील मुंगसे परिसरातील एका ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेस १७ रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती कोरोना मध्यम स्वरुपातील रुग्ण आहे. या महिलेचेे दोन्ही मुलं मुंबईला राहतात. ती महिला तीन महिन्यांपूर्वी मुंबईहून परतली होती. त्यानंतर २३ मार्चपासून त्या महिलेच्या परिसरात बाहरे गावाहून आठ जण आले होते.

या महिलेस त्रास जाणवू लागल्यामुळे तिला दोन जण मोटारसायकलवर चोपडा येथील एका दवाखान्यात घेवून गेले. तिथे तब्बेत सुधारत नसल्यामुळे या महिलेस जळगावातील एका खासगी दवाखान्यात घेवून गेले होते. त्यानंतर या महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या महिलेस कोरोना नियंत्रण कक्षात दाखल केले आहे.

या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील कोरोना संशयित १७ जणांची जिल्हा रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्या संशयित रुग्णांना महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मृत महिलेचा अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयात शनिवारी कोरोना संशयित अमळनेरातील एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. या महिलेस श्‍वसनाचा अधिक त्रास होता. त्यामुळे तिला १६ रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

नवीन १२ रुग्ण जिल्हा रुग्णालयात रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत कोरोना संशयित १२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेवून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील, असे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या