Sunday, May 5, 2024
Homeनाशिकआयटी उद्योगांचे वर्क फ्रॉम होम कल्चर; वेबिनार द्वारे सभासदांना प्रबोधन

आयटी उद्योगांचे वर्क फ्रॉम होम कल्चर; वेबिनार द्वारे सभासदांना प्रबोधन

सातपूर : उद्योग क्षेत्रात महत्वपूर्ण भाग असणाऱ्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचा या माध्यमातून जगभरातील व्यवसायाची गणिते सुरू असली तरी सभासदांचा प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याची गती वाढवण्यासाठी नीटा संस्थेच्या माध्यमातून वेबिनार द्वारे प्रबोधन करण्यात येत असल्याचे नीता नाशिकचे अध्यक्ष अरविंद महापात्र यांनी सांगितले.

नाशिक परिसरात सुमारे १७५ उद्योग नीटासोबत जोडलेले आहेत. प्रत्येक उद्योगांचे काम हे आपल्या घरी अजून सुरू आहे. त्यामुळे या उद्योगांना फारशी अडचण येत नसली तरी सेल्स विभागाला मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

या अडचणीच्या काळातुन आयटी उद्योगांना बाहेर काढण्यासाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार चर्चासत्रात पंचावन्न लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी हरबिंजर्स उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास जोशी यांनी प्रबोधन केले. या निर्माण झालेल्या परिस्थितीत आपल्या कामातील कंपनी अंतर्गत कामात काय करावे, बाहेरील कामात काय करावे, काय करू नये, याबाबत सविस्तर प्रबोधन केले. त्यासोबतच आपल्या उद्योगातील विविध अनुभव सांगून त्यांनी उद्योगांना प्रोत्साहित केले.

याच मालिकेतील दुसरे चर्चासत्र शुक्रवारी (दि.8) आयोजित करण्यात आले असून या चर्चासत्रात पुण्याचे आनंद देशपांडे हे उद्योजकांशी संवाद साधणार आहेत उद्योजकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अरविंद महापात्र यांनी केले आहे.

प्रत्यक्षात आयटी उद्योगांवर लॉकडाऊन चा फारसा परिणाम झालेला नाही. बहुतांश लोकांनी आपल्या घरी सेटअप केलेलेच होते. केवळ परस्परांची थेट संवाद होत नाही. अथवा विक्री करण्यात अडचण येत आहे. डिझाईनचे काम हे गतीने सुरू असून परदेशी काम करणाऱ्यांची कामे सुरळीत चालू आहेत.

डाटा सेंटर अथवा डाटा एन्ट्री करणाऱ्यांसाठी काही अंशाने अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण होऊ शकते, मात्र उद्योग सुरू झाल्यानंतर त्याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे अरविंद महापात्र यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या