Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आतापर्यंत 157 कोरोनाबाधितांचा मृत्यू

पुण्यात आतापर्यंत 157 कोरोनाबाधितांचा मृत्यू

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्हयात सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 1 हजार 139 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 630 आहे तर 157 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. दरम्यान जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 926 इतकी झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुणे विभागातील 1 हजार 237 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 365 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 953 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 115 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 926 बाधीत रुग्ण असून 1 हजार 139 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 1 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयातील 119 कोरोना बाधीत रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 97 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 264 कोरोना बाधीत रुग्ण असून 41 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 38 कोरोना बाधीत रुग्ण असून 28 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या