Friday, May 3, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : पाणी पुरवठा योजनेसह प्रलंबित कामांना गती देणार : आमदार खोसकर

त्र्यंबकेश्वर : पाणी पुरवठा योजनेसह प्रलंबित कामांना गती देणार : आमदार खोसकर

वेळूंजे वि. प्र : गणेशगाव परिसरातील पाणी पुरवठा योजनेसह प्रलंबित विकास कामांना गती देणार असल्याचे, प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी केले.

त्र्यंबक इगतपुरी तालुक्याचे आमदार मा. हिरामण खोसकर, तहसीलदार दिपक गीरासे व मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी यांनी गणेशगाव या ठिकाणी भेट दिली असता विविध कामासंदर्भात आढावा घेतला.

- Advertisement -

या वेळी गणेश गाव वा. येथील ग्रामपंचायत अंतर्गत व अन्य मंजुरीच्या मार्गावरती असणाऱ्या कामाची दखल घेत इतर खात्यांच्या अधिकारी यांना रखडलेली काम व अन्य मंजुरीविना प्रलंबित असलेल्या कामाबाबत त्यांनी माहिती घेतली.

सध्या गावात पाणीटंचाई जाणवत असून अधिकाधिक पाणी समस्येवर उपाययोजना करणार आहेत. सार्वजनिक वनहक्क दाव्यातून उपलब्ध झालेल्या जमिनीमध्ये विहीर खोदून व ज्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत आहे तिथून दोन्ही गावांना पिण्याचे मुबलक पाणी मिळेल असे आश्वासन यावेळी खोसकर यांनी दिले.

यावेळी गावातील अपंग व्यक्तींना मा. तहसील कार्यालय यातील सर्व कर्मचारी यांच्या सहयोगाने किराणा व जीवन आवश्यक वस्तूंचे केले. या वेळी सरपंच रुख्मिणी उदार, पोलिस पाटील देवचंद महाले, तलाठी मा. पाटील श्रीमती पगारे, जयराम मोंढे, लक्ष्मण महाले, ग्रामसेवक बी.जी.सांगळे, व अपंग लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. करोनापासून बचाव होण्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन आमदार खोसकर व तहसीलदार यांनी ग्रामस्थांना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या