Friday, May 3, 2024
Homeदेश विदेश१९ मे पासून प्रायोगिक तत्त्वावर विमान वाहतूक

१९ मे पासून प्रायोगिक तत्त्वावर विमान वाहतूक

नवी दिल्ली –  प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे वाहतूक सुरू केल्यानंतर केंद्र सरकार आता विमान वाहतूकही सुरू करण्याच्या तयारीत आहे. १९ मेपासून देशातील मर्यादित स्थानांवरील विमान वाहतूक सुरू करण्याची तयारी विमान वाहतूक मंत्रालयाने केली आहे. विमान वाहतूक सुरू करण्यासाठी संबंधित घटकांच्या मदतीने स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करण्यात आले आहे. काही नियमांसह विमान वाहतुकीला परवानगी दिली जाणार असल्याचे समजते.

देशात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर २५ मार्चपासून देशातील विमानवाहतूक बंद करण्यात आली आहे. सुरुवातीला देशाच्या विभिन्न भागात अडकलेल्या लोकांना आपापल्या शहरात जाण्यासाठी एअर इंडिया १९ मेपासून २ जूनपर्यंत विशेष अभियान चालवणार आहे. ही विमाने प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई या शहरांसाठी राहणार आहे. देशाच्या विविध भागातून दिल्लीसाठी १७३, मुंबईसाठी ४०, हैदराबादसाठी २५ आणि कोचिसाठी १२ उड्डाणांची व्यवस्था एअर इंडियाने केली आहे.

- Advertisement -

नागरी उड्डयण मंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर विमान वाहतूक सुरू केली जाणार आहे. प्रवाशांना प्रवासाआधी एक फॉर्म भरून द्यावा लागेल. त्यात करोना झाल्याची किंवा क्वारंटाईन केल्याची माहिती द्यावी लागेल. या प्रवाशांची तपासण्याची वेगळी व्यवस्था राहील. वेब चेक-इन करून विमानाच्या उड्डाणाच्या तीन तासआधी प्रवाशांना विमानतळावर पोहोचावे लागेल. प्रवाशांना मास्क आणि हातमोजे घालावे लागणार आहे, त्याचप्रमाणे भौतिक दूरतेचे पालन करावे लागणार आहे. विमानतळावर तसेच विमानात प्रवेश करतांना प्रवाशांचे थर्मल चेकिंग केले जाईल. त्यात ताप असणार्‍या प्रवाशांना विमानप्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. केबिन लगेजची परवानगी राहणार नाही. चेक-इन लगेज करावे लागेल. 80 वर्षांवरच्या प्रवाशांना प्रवासाची अनुमती नसेल. वैमानिक आणि कर्मचार्‍यांचीही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या