Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव : शिवकॉलनी जवळील अपघातामधील मृताची ओळख पटली

जळगाव : शिवकॉलनी जवळील अपघातामधील मृताची ओळख पटली

जळगाव | प्रतिनिधी

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात गॅस कंटेनरने धडक दिल्याने मोटारासायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना आज गुरुवार दि.१४ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शिवकॉलनी जवळील महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली.

- Advertisement -

पाळधीकडे जाणार्‍या गॅस कंटेनरने मोटारसायकल (क्र.एमएच १९ यू ५१३०) ला धडक दिली. यात मोटारसायकलस्वार कैलास हेमराज पवार (वय ४०, मूळ रा.पाल, ह.मु.पिंप्राळा मरिमाता चौक) हा जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पसार होण्याच्या प्रयत्नातील कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर मृताचा मोबाइल पोलिसांना आढळला. हा मोबाइल हेड कॉन्स्टेबल रवी नरवाडे यांनी ताब्यात घेतला. परंतु, अपघातात मोबाइल खराब झाला होता.

तो मोबाइल दुरुस्त करण्यासाठी नरवाडे यांनी एका कारागिराला शोधले. त्यास दुकान उघडण्यास सांगून मोबाइल दुरुस्त केला. त्यानंतर मोबाइलमधील नंबरवर संपर्क साधून मृताची ओळख पटवली. या अपघातामधील मृत कैलास पवार हा बांधकाम कारागिर होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या