Sunday, May 5, 2024
Homeनाशिकनाशिक : दुय्यम उपनिबंधक, प्रादेशिक परिवहन कार्यालये सुरु होणार

नाशिक : दुय्यम उपनिबंधक, प्रादेशिक परिवहन कार्यालये सुरु होणार

नाशिक । प्रतिनिधी

लाॅकडाउन चार आजपासून सुरु होत असून दुय्यम उपनिबंधक व प्रादेशिक परिवहन कार्यालये मर्यादित मनुष्यबळासह सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंटेंटमेंट झोन वगळता रेड व आॅरेंज झोनमध्ये ही कार्यालये सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. या दोन्ही कार्यालयातून शासनाला मोठया प्रमाणात महसूल मिळतो. आजपासून ही कार्यालये सुरु होणार आहेत.

- Advertisement -

मागील दिड महिन्यापासून लाॅकडाऊन जारी असून ३१ मे पर्यंत त्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र, हळूहळू जीवन पूर्वपदावर येऊन आर्थिक चक्र गतिमान व्हावे यासाठी उद्योग, व्यवसाय व अत्यावश्यक सेवा निगडित दुकाने यांना अटीशर्तीसह व्यवहार सुरु ठेवण्याचि परवानगी देण्यात आली आहे. शासनाला सर्वाधिक महसूल मद्य विक्रितून भेटतो. ही दुकाने सरकारने सुरु करत मद्य विक्रिला परवानगी दिली.

त्या खालोखाल दुय्यम उपनिबंधक व प्रादेशिक परिवहन कार्यालयातून शासनाच्या तिजोरीत मोठया प्रमाणात महसूल जमा होतो. दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन, घर खरेदी विक्री, प्राॅपर्टिचे भाडेकरार यांची नोंदणी व व्यवहार होऊन त्यातून टॅक्सद्वारे शासनाला महसूल प्राप्त होतो.

तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहनांची पासिंग, नंबर विक्री, वाहन परवाना मुदतवाढ, दंड आकारणी याद्वारे मोठया प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते.

शासनाने हि दोन्हि कार्यालये सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. कंटेटंमेंट क्षेत्र वगळता रेड व आॅरेंज झोनमधील दुय्यम उपनिबंधक कार्यालये ५ अधिकारी व कर्मचार्‍यांसह सुरु ठेवता येईल. तर परिवहन कार्यालये १० टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितिसह सुरु ठेवता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या