Friday, May 3, 2024
Homeधुळेधुळे : महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित शिबिरात शंभर जणांचे रक्तदान

धुळे : महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित शिबिरात शंभर जणांचे रक्तदान

जिल्हाधिकारी संजय यादव यांनी रक्तदान करून केले शिबिराचे उदघाटन

धुळे – प्रतिनिधी

- Advertisement -

धुळे जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांना प्रतिसाद म्हणून महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.

गेल्या काही दिवसांपासून रक्ताची टंचाई जाणवत आहे. ही बाब जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत रक्तदान करण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळे आजच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवसभरात किमान 100 जण रक्तदान करतील. प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करावे. आवश्यकता भासली, तर नागरिकांनी रक्तपेढीत जावून रक्तदान करावे, असेही आवाहन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री.गायकवाड यांनी रक्तदान शिबिराची पार्श्वभूमी विशद केली. कोणतीही आपत्ती असो, महसूल विभागाचा कर्मचारी मदतीसाठी पुढे असतो. आजच्या रक्तदान शिबिरातही हा कर्मचारी पुढेच आहे, असेही त्यांनी सांगितले.

धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मन्सूर शेख, उपाध्यक्ष छोटू चौधरी, सचिव अविनाश सोनकांबळे, सहसचिव योगेश जिरे, कोशाध्यक्ष उमेश नाशिककर, संजय शिंदे, श्रीकांत देसले, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन.वाय.कुलकर्णी, चिटणीस वाय.आर.पाटील, राज्यस्तरीय सदस्य एस.बी.मोहिते, ए.ए.भामरे, कार्याध्यक्ष सी.यू.पाटील आदींनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या