Friday, May 3, 2024
Homeनाशिकपंचवटीतील प्रतिबंधित क्षेत्रांची मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वैद्यकीय पथकासह केली पाहणी

पंचवटीतील प्रतिबंधित क्षेत्रांची मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वैद्यकीय पथकासह केली पाहणी

नाशिक । प्रतिनिधी

पंचवटी परिसरातील क्रांतीनगर,रामनगर व सरस्वती नगर या भागातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली.त्यावेळी त्यांचे समवेत स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. यावेळी विविध कामांच्या सूचना मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित विभागांना दिल्या.

- Advertisement -

पंचवटीतील क्रांतीनगर परिसराची पाहणी करून प्रतिबंधित क्षेत्राचा परिसर वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.तसेच या भागातील प्रतिबंधित क्षेत्रात वारंवार औषध फवारणी करणे तसेच सार्वजनिक शौचालयांचे स्वच्छता करून त्याठिकाणी औषध फवारणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच मा.नगरसेवक अशोक मुर्तडक यांच्याशी मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संवाद साधला.

रामनगर परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून परिसरातील मार्केट यार्ड परिसर नियमित स्वच्छ करण्यात यावे व त्या ठिकाणी वारंवार औषध फवारणी करण्याच्या सूचना बाजार समितीला देणेबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना सूचित करणेत आले. तसेच रामनगर व परिसरातील सुलभ शौचालयांची स्वच्छता करून त्या ठिकाणी व परिसरात वेळोवेळी औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी मा.नगरसेवक गुरमित बग्गा, कमलेश बोडके व आर.आर.पाटील उपस्थित होते. यांच्याशी मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परिसरातील नियोजना बाबत चर्चा केली.

रासबिहारी रोड परिसरातील सरस्वती नगर येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली यावेळी परिसरात स्वच्छता करण्याच्या व परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना वैद्यकिय पथकास यावेळी देण्यात आल्या परिसरातील मा.नगरसेविका प्रियंका माने व धनंजय (पप्पू) माने आदी उपस्थित होते.

या दौर्‍यात मा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमवेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र त्रंबके,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत,विभागीय अधिकारी विवेक धांडे,उपअभियंता आर.एस.पाटील,सहाय्यकआरोग्य अधिकारी डॉ.अजिता साळुंके, डॉ.विजय देवकर ,डॉ. जगताप विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, आरोग्य अधिकारी स्वच्छता निरीक्षक उदय वसावे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या