Sunday, May 5, 2024
Homeनाशिकएका क्लिकवर समजू शकते चक्रीवादळाची स्थिती…

एका क्लिकवर समजू शकते चक्रीवादळाची स्थिती…

नाशिक :  अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आज पहाटेपासून  रिमझिम पावसासोबत वादळाला सुरुवात झाली आहे.  मुंबई, अलिबागच्या दिशेने निघालेले हे वादळ नाशिक शहर, इगतपुरी, चांदवड मालेगाव परिसरात घोंगावण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे.

अनेक भागांत बत्ती गुल झाली आहे. अनेक ठिकाणी रिमझिम पावसासह वादळ सुरु झाल्यामुळे कंपन्यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.  नाशिक विभागातील जिल्ह्यांवर या वादळाचा परिणाम जाणवणार आहे.

- Advertisement -

हे वादळ नंदुरबार पर्यंत राहणार आहे.  दुपारी २ ते ३ च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात इगतपुरीच्या मार्गाने वादळ धडकण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना प्रशासनाकून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इगतपुरी, नाशिक, चांदवड या परिसरात वादळाचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिक येवला तालुक्यातील अंदरसुल ला निसर्ग वादळाचा तडाखा अंदरसुल गोल्हेवाडी रोड परिसरात वादळ धडकुन अंदरसुल धामणगाव शिव परिसरात गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फामँचे प्रचंड नुकसान तसेच परिसरातील ५०० मीटर शिवारात झाडं उन्मळून पडले पत्रे उडाले त्यात त्यांचे सुमारे 20 ते 25 लाखाचे नुकसान झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या