Sunday, May 5, 2024
Homeराजकीयजामखेड पंचायत समितीच्या सभापती पदाचा तिडा कायम

जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदाचा तिडा कायम

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवड प्रक्रिया दरम्यान समान मतदान झाल्याने व न्यायालयाच्या आदेशानुसार आज निवडीचा निकाल घोषित न करण्याचा आदेश दिल्याने सभापती पदाच्या निवडीचा तीढा कायम राहीला लवकरच न्यायालयाच्या पुढील निर्णयानंतर चिठ्ठी द्वारे सभापती पदाची निवड जाहीर होणार असल्याची कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली.

आज शुक्रवार ३ जुलै रोजी जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभा बोलावण्यात आली होती. त्यानुसार सभापती पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिले साठी होते या वेळी पंचायत समिती सदस्या सौ मनिषा रवींद्र सुरवसे आणि दुसर्‍या पंचायत समिती सदस्या सौ राजश्री सुर्यकांत मोरे, आणि पंचायत समिती सदस्य डॉ भगवान सदाशिव मुरुमकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु सभापती पद महिलेसाठी आरक्षित आसल्याने डॉ. भगवान सदाशिव मुरुमकर यांनी मागासप्रवर्ग (ओ बी सी) या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता.

- Advertisement -

मात्र त्यांचा छाणनी मध्ये बाद करण्यात आला. त्यामुळे सभापती पदासाठी सौ मनिषा सुरवसे आणि सौ राजश्री मोरे या दोन सदस्यांचे अर्ज राहिले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी मतदान घेतले. या दरम्यान सदस्यांचे संख्या बळ चार असल्याने मतदान हात उंचावून घेण्यात आले. त्यानुसार राजश्री सुर्यकांत मोरे व मनिषा रवींद्र सुरवसे यांना समान मतदान झाले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार सभापती पद हे जाहिर न करण्याचा आदेश असल्याने सभापती पदाचा निकाल हा न्यायालयाच्या आदेशानंतर व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सभापती निवडीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सदरची निवडणूक प्रक्रिया उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, कृषी अधिकारी अशोक शेळके, यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी कसलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या