Friday, May 3, 2024
Homeनगरचिंचोडी पाटील येथे शेततळ्यात बुडून चुलत भाऊ, बहिणीचा मृत्यू

चिंचोडी पाटील येथे शेततळ्यात बुडून चुलत भाऊ, बहिणीचा मृत्यू

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे वस्तीजवळ असणार्‍या शेत तळ्यात बुडून चुलत भाऊ व बहिणीचा मृत्यू झाला. ही घटना चिचोेंडी पाटील येथील पठार वस्तीवर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. तुषार राजेंद्र पवार (वय- 11) व संस्कृती संदीप पवार (वय- 9) अशी मृत पावलेल्या भाऊ- बहिणींची नावे आहेत.

- Advertisement -

चिचोंडी जवळील पठार वस्तीजवळ गुरे चारताना शेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये तुषार व संस्कृती हे दोघे पडल्याचे कळताच शेततळ्याजवळ मोठी गर्दी झाली. दोघांना बाहेर काढून तात्काळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयातील डॉ.दहातोंडे यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत चिंचोडी पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र रघुनाथ पवार यांचा मुलगा व त्यांचे बंधू संदीप रघुनाथ पवार यांची मुलगी आहे. या घटनेमुळे चिचोंडी पाटील परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या