Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमंदिरातील सेवेकर्‍यांना दहा ते पंधरा हजार रुपये वेतन द्यावे

मंदिरातील सेवेकर्‍यांना दहा ते पंधरा हजार रुपये वेतन द्यावे

पुणे (प्रतिनिधी) | Pune –

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत तर समाजातील विविध घटकांमध्ये याचा तीव्र परिणाम होताना दिसत आहे. संकटात सापडलेला प्रत्येक घटकाकडून सरकारने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोरोना संकटामुळे गाव-खेड्यातील मंदिरांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरातील प्रत्येक सेवेकऱ्याला महिन्याला दहा ते पंधरा वेतन द्यावे. एक एप्रिलपासून केंद्राची कोरोना अधिसूचना मागे घेण्यापर्यंत वेतन देण्यात यावं. त्याचबरोबर मंदिराच्या देखभालीसाठी एक रकमी तीन लाख रुपये देण्यात यावे. राज्यातील संपन्न मंदिरांकडून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाने केली आहे.

- Advertisement -

हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. “सरकारनं गाव खेड्यातील 30 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न नसलेल्या मंदिरांची यादी तयार करावी. या मंदिरांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन करावं. सरकारला यासंदर्भात काही कायदेशीर अडचणी असतील तर राज्यातील आर्थिक संपन्न मंदिर आणि संस्थांकडून निधी उपलब्ध करण्यात यावी”, असं सुनील घनवट यांनी सूचवलं आहे.

“लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्राचतील अनेक खेड्यांतील मंदिराची देखभाल, दुरुस्ती करायची राहिली आहे. मंदिरात धार्मिक पुजा करणाऱ्या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे”, अशी विनंती सुनील घनवट यांनी केली.

सुनील घनवट यांनी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, शिर्डी साई संस्थान, त्र्यंबकेश्वर मंदिर, काळाराम मंदिरसारख्या संपन्न मंदिर आणि लालबागचा राजा सारख्या गणेशोत्सव मंडळांकडून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. या सर्व मंदिर आणि संस्थांची संपत्ती ही हिंदू भक्तांची आहे. गाव खेड्यातील मंदिरं टिकली तरच हिंदू बांधवांच्या धार्मिकतेचे संरक्षण होईल. त्यामुळे सरकारने मदत करावी, असं हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या