Friday, May 3, 2024
HomeUncategorizedपुणे महापालिकेच्या मुख्य सभेत वेशभूषा आंदोलन

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत वेशभूषा आंदोलन

पुणे (प्रतिनिधी)– कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा हॉट आहे, रुग्णांना खाटा मिळत नाही, प्रशासनाकडून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी हव्या तशा सुविधा निर्माण केल्या गेल्या नाही याच्या निषधार्थ आज मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे व साईनाथ बाबर यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत अत्यवस्थ रुग्णांची वेशभूषा करत पालिकेच्या सभागृहात प्रवेश केला आणि महापौरांसमोर कोरोना बाधित रुग्णांची व्यथा मांडली.

यापूर्वी वसंत मोरे व साईनाथ बाबर यांनी कोरोनाबाधितांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून महापालिकेच्या मुख्य इमारतीत खाटा टाकून आंदोलन केले होते. पण, तरीसुद्धा रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या मुख्य सभेत हे आंदोलन केले.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची होणारी हेळसांड मुख्य सभागृहाच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही अशाप्रकारे आंदोलन केल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हे आंदोलन केले . पण, जर अशीच परिस्थिती सुरू राहिली तर येत्या काळात सर्वसामान्य नागरिकही याठिकाणी येतील. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे व्हावे सर्वसामान्य रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या