Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यासोन्यात सात वर्षातील सर्वात मोठी घसरण

सोन्यात सात वर्षातील सर्वात मोठी घसरण

नवी दिल्ली

गेल्या दाेन दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Rate) घसरण कायम आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १,८७२.१९ डॉलर्स या तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आला. त्यामुळे भारतातही सोन्याचा भावात घसरण झाली. भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४९,९५५ रुपये झाला. एका दिवसातील घसरणीचा विचार केला तर तब्बल सात वर्षात सोने पहिल्यांदाच एकाच दिवशी इतके घसरले आहे.

- Advertisement -

सोने दर ५८ हजारांच्या घरात पोहोचला होता. मात्र, सातत्याने वाढ होणाऱ्या सोने दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किलोच्या दरातही अनपेक्षित मोठी घट झाली आहे. एका वर्षाचा विचार केला तर मात्र सोन्याचे भाव तब्बल २५ टक्क्यांनी वधारले होते. गेल्या सत्रामध्ये तब्बल १५ टक्क्यांनी घसरलेले चांदीचे भावही आणखी २.८ टक्क्यांनी घसरले व प्रति औंस २४.११ डॉलर्स झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे भारतातही सोन्याचे व चांदीचे भाव घसरत आहेत.

गेल्या चार दिवसांत ६००० रुपयांची घसरण सोन्यात झाली आहे. दिल्लीत सोन्याच्या किंमती १५०० रुपयांनी खाली आल्या. काही दिवसांपूर्वी सोन्याची किंमत ५८ हजार रुपयांवर पोहोचली होती, पण आजच्या घसरणीनंतर पुन्हा ते प्रति १० ग्रॅम ५० हजारांची खाली आली आहे. मंगळवारी सोने दरात ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. आजही अडीच टक्के सोने खाली आले आहे. आज चांदी देखील प्रतिकिलो चार हजार रुपयांच्या घसरणीसह बाजाराला सुरुवात झाली. चांदी ६३ हजार रुपये प्रति किलोच्या खाली किंमत आली आहे. याआधी चांदीचा दर ७६ हजार रुपये किलोचा भाव होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या