Tuesday, May 7, 2024
Homeनगरचेअरमन या नात्याने कोणत्याही चौकशीला तयार-बाळासाहेब विघे

चेअरमन या नात्याने कोणत्याही चौकशीला तयार-बाळासाहेब विघे

टिळकनगर |वार्ताहर| Tilknagar

तालुक्यातील टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाचा अहवाल फेटाळण्यात आला आहे,

- Advertisement -

सहाय्यक निबंधक श्री. माने यांच्या स्तरावर चौकशीचे कामकाज चालू आहे तरी मी चेअरमन या नात्याने कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे संस्थेचे चेअरमन बाळासाहेब विघे यांनी म्हटले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित टिळकनगर या संस्थेच्या चेअरमन म्हणून मी दिनांक 14 एप्रिल 2011 पासून संस्थेचा कारभार पाहत आहे. तरी माझ्या कालखंडामध्ये जे काही संस्थेचे ऑडिट झालेले आहे ते सर्व अ वर्गातले असल्याचे चेअरमन बाळासाहेब विघे यांनी म्हटले आहे.

संस्थेच्या सभासदांना त्यांच्या गरजेनुसार योग्य त्या पद्धतीने कर्जवाटप होत आहे. सभासदांच्या मुलांचे शालेय शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जात वाढ केली आहे. तसेच सभासदांची अडचण पाहून सर्वसाधारण कर्जात वाढ व तातडी कर्जात वाढ केलेली आहे. त्यानंतर मालक संस्थेकडे अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या रकमा माझ्या कार्यकाळात वसूल केल्या आहेत.

सभासदांच्या हिताच्यादृष्टीने अनेक योजना राबविल्या आहेत. मालक संस्थेतून सभासद सेवानिवृत्त होत असताना सभासद संख्येत वाढ होण्यासाठी मालक संस्थेतील सीटीसी अंतर्गत कामगारांसाठी संस्थेच्या पोट नियमात दुरुस्ती करून सीटीसी अंतर्गत कामगारांना सभासद करून घेतले.

संस्था चालवत असताना सहकार कायदा 1960 नुसार कोणत्याहीप्रकारे नियमाचे उल्लंघन न करता संस्थेचे कामकाज योग्यप्रकारे चालू आहे. असे असतानाही संस्थेबद्दल तक्रारदार यांनी दि. 24 ऑगस्ट 2020 च्या बातमीत उल्लेख केलेली रक्कम 77 लाख 56 हजार नऊशे एवढी दाखवलेली आहे.

ती रक्कम खोटी असून सभासद व संस्थेची बदनामी करणारी आहे. सदर रक्कम भरणा केलेली आहे. परंतु काही तक्रारदार सभासद यांचेकडून संस्थेच्या पुढील निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता माझी व संस्थेची बदनामी करण्याचे कारस्थान चालू आहे.

मी तक्रारदारांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे तसेच सहाय्यक निबंधक श्रीरामपूर यांनी नेमणूक केलेले चौकशी अधिकारी, अ‍ॅड. श्री. मुळे यांनी चौकशी करून अहवाल दिलेला आहे, परंतु सदर अहवाल सहाय्यक निबंधक यांनी अपेक्षित नमुन्यात नसल्याने तो अमान्य केलेला असून हा अहवाल फेटाळला आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे.

सहाय्यक निबंधक श्री. माने यांच्या स्तरावर चौकशीचे कामकाज चालू आहे. तरी मी चेअरमन या नात्याने कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे विघे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या