Sunday, May 5, 2024
Homeनगरआमदार मोनिकाताई राजळे करोना पॉझिटिव्ह

आमदार मोनिकाताई राजळे करोना पॉझिटिव्ह

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांना करोनाची बाधा झाली असुन त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई येथे आगामी दोन दिवस चालणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्व आमदारांनी करोनाची टेस्ट करून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते.

त्या नुसार काल दिनांक ४ सप्टेंबर रोजी आमदार मोनिकाताई राजळे यांचा पाथर्डी येथील कोव्हिड सेंटर मध्ये स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आला होता.आज सायंकाळी हा अहवाल आला असून त्या अहवालानुसार त्या करोना पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

हा अहवाल आला त्या वेळी आ. राजळे या आपल्या पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील सिध्दसावली निवासस्थानीच होत्या. त्यांचा करोना चाचणी आल्यानंतर त्या तातडीने नगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी गेल्या.

त्यांना कोणताही त्रास जाणवत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना आपल्या घरीच राहून उपचार घेण्यास सांगितले असल्याने त्या नगर येथील आपल्या व्हाईट हाऊस या निवासस्थानी उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या गाडीचे चालक व स्वीय सहायक यांची सुद्धा करोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र ती निगेटिव्ह आली आहे.

या पूर्वी आमदार मोनिकाताई राजळे ह्या एका करोना बाधित नातेवाईकाच्या संपर्कात आल्या नंतर त्यांनी स्वतःहून १२ दिवस विलगीकरण कक्षात होत्या. मात्र आज त्यांना करोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाल्याने मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनात त्या सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या