Friday, May 3, 2024
Homeनाशिक165 दिवसांत मध्य रेल्वेकडून 22.28 दशलक्ष टन मालवाहतूक

165 दिवसांत मध्य रेल्वेकडून 22.28 दशलक्ष टन मालवाहतूक

ना. रोड । Nashik Road (प्रतिनिधी)

मध्य रेल्वेने लॉकडाउन आणि अनलॉक कालावधीच्या 165 दिवसात 22.28 दशलक्ष टन मालवाहतूक 4.25 लाख वॅगनमधून केली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

- Advertisement -

उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वेळेवर मालवाहतूक खात्रीने करण्यासाठी, रेल्वेने कोविड-19 मुळे लॉकडाऊन व अनलॉक असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. उद्योगांच्या गरजा भागविण्यासाठी मध्य रेल्वेने 23 मार्च 2020 ते 3 सप्टेंबर 2020 पर्यंत 165 दिवसात 22.286 दशलक्ष टन मालवाहतूक यशस्वीरित्या केली.

मध्य रेल्वेने 23 मार्च ते 3 सप्टेंबर या 165 दिवसांत कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची 8,899 मालगाड्यांच्या माध्यमातून 4,24,931 वॅगन्सची मालवाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी 2,575 वॅगन्सची मालवाहतूक भारीत (लोडींग) केली गेली.

मध्य रेल्वेने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविध वीज प्रकल्पांना उपरोक्त कालावधीत 1,60,002 वॅगन कोळसा लोड केले आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी 2,634 अन्नधान्याचे वॅगन्स, 2,213 साखरेचे वॅगन्स, 19,921 खतांचे वॅगन्स आणि 6,192 कांद्यांचे वॅगन्स; पेट्रोलियम पदार्थांचे 42,029 वॅगन्स; लोह आणि स्टीलच्या 11,297 वॅगन्स; सिमेंटच्या 27,301 वॅगन्स, कंटेनरच्या 1,32,105 वॅगन्स आणि डी-ऑईल केक आणि इतर वस्तूंच्या सुमारे 21,237 वॅगन्स देखील लोड करण्यात आल्या.

मालवाहतुकीच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी रेल्वे सेवक 24/7 तत्वावर विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांत काम करत आहेत. लोको पायलट, गार्ड कुशलतेने गाड्या चालवत आहेत.

ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हरहेड उपकरणे, लोकोमोटिव्ह्ज, डब्बे आणि वॅगन्सचे मुख्य देखभाल करणारे सेवक गाड्यांची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या स्थितीत राखत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या