Friday, May 3, 2024
Homeनाशिकयंदा उडीद व मुगाच्या उत्पादनात घट

यंदा उडीद व मुगाच्या उत्पादनात घट

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामासाठी यंदा चालू वर्षी उडीद व मूग या डाळ वर्णीय नगदी पिकांना पंसती दिली होती.

- Advertisement -

सुरुवातीस हे पिक अतिशय जोरात बहरात आले परंतु अचानक हवामानात बदल परिणाम झाला की, काय त्यांमुळे उडीद, मूगाच्या पिकांत मोठया प्रमाणावर घट पहण्यास मिळत आहे.

सुरुवातीस तालुक्यात ऊन व पाऊस यांमुळे उडीद व मूग पिकाला पोषक वातावरण तयार झाले होते. भीज स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे या पिकांवर विविध प्रकारचे रोग, तुडतुडे, आळी, किड नसल्यामुळे उडीद, मूगाचे पिक चांगले येईल. यांमुळे शेतकरी वर्ग खुशीत होता, मात्र थोड्याच दिवसात या पिकाला दृष्ट लागावी तसा प्रकार होऊन उडीद व मूगाचे झाड पिवळे पडू लागले. यामुळे अनेक शेतक-यानी फवारणी सुद्धा केली, पंरतु फारसा फरक पडला नाही या पिकांचे झाड पुन्हा हिरवे झाले नाही. त्याचा परिणाम या झाडाना शेंगा अतिशय कमी प्रमाणात आल्या तर काही झांडाना शेंगा आल्याच नाही त्यांमुळे शेतक-याच्या आनंदावर विरजन पडले आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये उडीद व मूगाचे पिक बऱ्या पैकी घेतले जाते बाकी ठिकाणी शेतकरी फक्त घरासाठी या पिकांची पेरणी करतात काही शेतकरी भुईमुगाच्या शेता मध्येच उडीद व मूगा या पिकाची पेरणी करतात मात्र चालू वर्षी सर्व ठिकाणी हे पिक पिवळे पडल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे हे पिक बहरात पिवळे पडण्याचा प्रकार तालुक्यात पहिल्यादां पाहण्यास मिळत आहे कधीही अतिवृष्टीमुळे सुध्दा या पिकाची नुकसान झालेली नाही या वर्षी मात्र उडीद मूगाच्या पिकांने शेतकऱ्याची घोर निराशा केली आहे.

अनेक शेतक-यांना या वेळीस कुटुंबासाठी बाजारातून उडीद ,मूगाची खरेदी करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिंडोरी तालुक्यात उडीद व मूगाच्या पिकांने शेतक-यांची मोठ्याप्रमाणात निराशा केली असून हे पिक बहरात पिवळे पडण्यांचा प्रकार पहिल्यादां पाहण्यास मिळत आहे तरी कृषी विभागाने यांची दखल घ्यावी.

– राजेंद्र विधाते ओझे

- Advertisment -

ताज्या बातम्या