Friday, May 3, 2024
Homeनगरबोधेगाव येथील पाचपुते वस्तीवर घरफोडी

बोधेगाव येथील पाचपुते वस्तीवर घरफोडी

बोधेगाव |वार्ताहर| Bodhegav

येथील एकबुरजी येथे माजी सैनिक पाचपुते वस्तीवर बुधवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून

- Advertisement -

रोख रक्कम व सोने-चांदीच्या मौल्यवान दागिन्यांसह एकूण सुमारे 1 लाख 79 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबातत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती बोधेगावपासून 3 कि.मी. अंतरावरील एकबुरजी वस्तीवर काही अंतरावर माजी सैनिक परशुराम पाचपुते यांचे आई-वडील, भाऊ या वस्तीवर राहत असून बुधवारी पहाटेच्या सुमारास घराची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील तीन पेट्यांसह सामान दरोडेखोरांनी लंपास केल्या जात असताना घरात झोपलेल्या रुक्मिणीबाईना आवाजानं जाग आली.

त्यांनी आरडाओरड करताच लगतच्या शेडमध्ये झोपलेला मुलगा नानासाहेब पाचपुते जागा झाला असताना त्यास चोरांनी लगतच्या तुरीच्या शेतात पेट्यांसह पोबारा करत असल्याचे दिसल्याने नानासाहेब भागूजी पाचपुते यांनी चोरांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी दगडफेक केल्याने त्यांचा एकट्याचा प्रयत्न तोकडा पडला गेला.

फिर्यादीचे वडील भागूजी पाचपुते यांच्या झोपलेल्या खोलीचा बाहेरून दरवाजा लावण्यात आला होता. तो उघडून झालेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर माजी सैनिक परशुराम पाचपुते, बाळासाहेब काशीद, अशोक घोरतळे आदी ग्रामस्थ घटनास्थळी आल्यानंतर परिसरात चोरांचा तपास केला असता तोपर्यंत चोरांनी पोबारा केला.

मात्र लंपास केलेल्या पेट्या दादासाहेब काशीद, राजेंद्र गायकवाड, आबासाहेब देसले यांच्या शेतात उपकापाचक केलेल्या तीन पेट्या आढळून आल्या. त्यातील रोख रक्कम, महिलांच्या गळ्यातील असलेल्या कर्ण फूल, नथ आदी सोने-चांदीच्या मौल्यवान वस्तू गायब केल्या. घटनेची माहिती पोलिसांना देताच बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे अभय लबडे, अण्णा पवार यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, उपनिरीक्षक पावरा, गोरे ताफ्यासह दाखल झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.

श्वान पथकाने सदर घटनेपासून शेताजमिनीतून सुमारे एक किलोमीटर अंतरावर शेवगाव-गेवराई मार्गावरील कांचन हॉटेल पर्यंत मार्ग दाखवला. मात्र श्वान त्या ठिकाणी काहीवेळ घुटमळल्याने दरोडेखोरांनी वाहनातून पलायन केले असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या