Sunday, May 5, 2024
Homeनगरसोमवारपासून मनपा स्थायी सभापतीपदासाठी अर्ज

सोमवारपासून मनपा स्थायी सभापतीपदासाठी अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी पिठासीन अधिकारी तथा कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी निवडणुकीचा कार्यक्रम आज शुक्रवारी जाहीर केला आहे.

- Advertisement -

सोमवारपासून उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करण्यास सुरूवात होणार असून उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रिया ऑनलाईनच होईल अशी माहिती नगरसचिव एस.बी. तडवी यांनी दिली.

स्थायी समितीच्या नव्या 8 सदस्यांची निवड झाल्यानंतर नव्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी महापालिकेने विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविला होता. विभागीय आयुक्तांनी 25 सप्टेंबरला निवडणूक घोषित करत नगरचे कलेक्टर राहुल द्विवेदी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

पीठासीन अधिकारी द्विवेदी यांनी आज सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. इच्छुकांना सोमवारपासून (दि.21) ते गुरूवारपर्यंत दुपारी दीड वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करता येणार आहे. दाखल झालेले अर्ज शुक्रवारी सभेच्या दिवशी पीठासीन अधिकार्‍यांकडे सादर केले जातील.

ऑनलाईन सभेत पहिल्या दहा मिनिटात दाखल अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर पुढचे पंधरा मिनिटे हे माघारीसाठी दिले जातील. माघारीची प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहे.

माघारीनंतर एकापेक्षा जास्त उमेदवार राहिल्यास ऑनलाईन पध्दतीने मतदान घेतले जाणार आहे. एकच अर्ज शिल्लक राहिला तर मात्र निवडणूक बिनविरोध घोषित केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या