Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशताजमहाल पर्यटकांसाठी खुला

ताजमहाल पर्यटकांसाठी खुला

नवी दिल्ली –

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ताजमहाल 21 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाने पर्यटकांसाठी

- Advertisement -

नियमावली तयार केली आहे. पर्यटकांना करोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार असून दिवसभरात फक्त पाच हजार पर्यटकांनाच ताज पाहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील पर्यटनस्थळे मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती.

ताजमहालचे दरवाजे 17 मार्चपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होतो. ताजबरोबरच आग्रा येथील किल्लाही पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असून दररोज फक्त अडीच हजार पर्यटकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन तिकीट बुक करावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या