Friday, May 3, 2024
HomeUncategorizedचीनमध्ये होते सोन्याची सर्वात जास्त विक्री

चीनमध्ये होते सोन्याची सर्वात जास्त विक्री

मुंबई – Mumbai

गुरुवार दि.२४ रोजी स्पॉट गोल्डच्या किंमतीमध्ये घसरण झाली. फेस्टिव्ह सीझन सुरू होण्याआधी कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता वाढली आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारीचे प्रमाणे देखील वाढले आहे. या सर्वाचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवर होत आहे. मल्टी कमोडिटीज एक्सचेंजवर सोन्याचे दर 613 रुपये प्रति तोळाने कमी होत 49,638 रुपये प्रति तोळा झाले आहेत. जगभरामध्ये भारतात दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची विक्री होते. सर्वात जास्त विक्री चीनमध्ये होते.

- Advertisement -

दिल्लीतील सराफा बाजारातील सोन्याचे दर

काल दिल्लीतील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे गुरुवारी सोन्याचे दर 485 रुपये प्रति तोळा स्वस्त झाल्याने 50,418 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीमध्ये 2081 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. यानंतर चांदी 58,099 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. मोठ्या कालावधीनंतर चांदी 60 हजारांच्या खाली आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या