Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअतिवृष्टीने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अतिवृष्टीने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नाशिक । Nashik

सप्टेंबरच्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील ३७ हजार ८२९ हेक्टरवरील पिके व फळबागा आडव्या झाल्या आहेत.

- Advertisement -

मका, बाजरी, ज्वारी, कांदा या पिकांना सर्वाधिक फटका बसल्याचे पंचनाम्यांच्या प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे.

आॅगस्ट व चालू सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे धरणे लबालब भरली असली तरी अतिवृष्टीच्या तडाख्याचा हाता तोंडाशी आलेल्या पिकांना जोरदार तडाखा बसला आहे.

जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्व तालुक्यांना नूकसानिचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिरायती, बागायती व बहुवार्षिक फळ बागा असे एकूण ३७ हजार ८२९ हेक्टरवरील पिके आडवी झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर येत आहे.

त्यात प्रामुख्याने जिरायती क्षेत्रात ज्वारी, बाजरी, मका, भात, सोयाबीन, कापूस या पिकांना तडाखा बसला आहे. तर बागायती क्षेत्रात ऊस, कांदा, टॅोमाटो व भाजिपाल्याचे अतोनात नूकसान झाले आहे. तर बहुवार्षिक फळ पिकांमध्ये द्राक्ष व डाळिंब बागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

एकूण २६३ गावांतील ४४ हजार ८५९ शेतकर्‍यांना अतिवृष्टिचा फटका बसला आहे. अगोदरच करोना संकटाने बळिराजा संकटात असताना आता हातातोंडाशी आलेले शेतातले उभे पिक आडवे झाले आहे. या आस्मानी संकटाने बळिराजा हवालदिल झाला आहे.

जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर पंचनामे पूर्ण करुन अहवाल शासनाला पाठवला आहे. दरम्यान जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रिवादळाची पिक नुकसानीचे पंचनामे होउनही अद्याप मदत प्राप्त झाली नाही. हा अनुभव लक्षात घेता अतिवृष्टीमुळे झालेल्या नूकसानीची मदत मिळणार का अशी भिती बळीराजामध्ये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या