Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिन्नर : नांदूरशिंगोटे सहा दिवस बंद

सिन्नर : नांदूरशिंगोटे सहा दिवस बंद

नांदूरशिंगोटे | Nandurshingote

नांदूर-शिंगोटेसह परिसरातील करोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन आजपासुन ४ ऑक्टोबर पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान आज येथील युवकासह एका व्यावसायिकाचे उपचार सुरू असताना निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकात दहशत पसरली आहे.

नांदूरशिंगोटे हे प्रमुख बाजारपेठेचे गाव असल्याने व सध्या साथीच्या आजारात बरोबरच, शेती कामाची लगबग असल्याने वेगवेगळ्या शेती साहित्य, खते, औषधे, बियाणे याचबरोबर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी शेतकरी येत आहेत.

त्याचप्रमाणे इतर खरेदीसाठीही बाजारपेठेत गर्दी होत असल्याने कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतर, मास्क न वापरणे आदी सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने करोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे.

सातत्याने गाव बंद ठेवणे हिताचे नसूनही ग्रामस्थांच्या मागणीनुसार केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सर्व ग्रामस्थ व व्यावसायिकांनीही पहिल्या दिवसापासूनच सक्रिय पाठिंबा दिल्याने ग्रामस्थांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी असल्याचे सरपंच शेळके यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या