Friday, May 3, 2024
Homeधुळेशेतीच्या वादातून तिघांना मारहाण

शेतीच्या वादातून तिघांना मारहाण

धुळे -Dhule – प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील मलांजन शिवारातील शेतात शेतीच्या वादातून कुटुंबातील तिघांना मारहाण करण्यात आली.

- Advertisement -

ट्रॅक्टरने घर पाडून गहु व 30 हजार रूपये जबरीने नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 17 जणांवर साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पुष्पाबाई अरूण अहिरराव (वय 48 रा. मलांजन) यांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याचा मंलाजन शिवारातील शेट गट नं. 155/3 व 155/2 ब बाबत न्यायालयात वाद चालु होता.

त्याबाबत पुष्पाबाई यांच्या बाजुने न्यालयाने निकाल दिलेला आहे. तरी देखील हिंमत अहिरराव यांच्यासह 17 जणांनी पुष्पाबाई, त्याचे पती अरूण अहिरराव व मुलगा निलेश यांना बांबु, विळा व लोखंडी रॉडने मारहाण केली.

तसेच पुष्पाबाई यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची माळ व पाच ग्रॅमचे सोन्याचे कानातले, जबरीने काढून घेतले.

तसेच ट्रक्टरने घर पाडून घरातील अंदाजे दहा पोते गहु व 30 हजार रूपये रोख जबरीने घेवून गेले. ही घटना दि. 26 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी हिंमत अरूण अहिरराव, कल्पना हिंमत अहिरराव, प्रशांत हिंमत अहिरराव, रोहित हिंमत अहिरराव सर्व रा. मलांजन, दत्तात्रय राघो देवरे रा. म्हसदी, प्रकाश निंबा साळुंखे, सोनु प्रकाश साळुंखे, सयाजी फकीरा ठाकरे, महेंद्र सयाजी ठाकरे, शरद सयाजी ठाकरे, रमेश अहिरे, आबा अहिरे रा. चिंचावड ता. सटाणा, नंदुरावसाहेब हरी काकुस्ते रा. शेणपूर ता. साक्री व इतर तीन ते चार जण यांच्याविरूध्द साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान पोलिसांनी हिंमत, प्रशांत व रोहित अहिरराव यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या