Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना 516.30 कोटीची शासन हमी मंजूर

राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना 516.30 कोटीची शासन हमी मंजूर

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

गाळप हंगाम 2020-21 करीता राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून एकूण रु.516.30 कोटी अल्पमुदत कर्ज घेण्यास शासन शासनहमी मंजूर करण्यात आली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील कोपरगाव, कुकडी, वृद्धेश्वर, प्रवरा या चार साखर कारखान्याचा समावेश आहे.

- Advertisement -

साखर आयुक्त यांनी गाळप हंगाम 2020-21 साठी दर्शविलेले अंदाजित गाळप विचारात घेऊन राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून एकूण रु. 516.30 कोटी अल्पमुदत कर्ज घेण्यासाठी व त्यावरील व्याजास शासन हमी देण्याबाबत सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दि.22 सप्टेंबर व व दि.7 ऑक्टोबर 2020 रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे . त्यानुषंगाने 32 सहकारी साखर कारखान्यांना शासन हमी देण्यात आली आहे.

या 32 सहकारी साखर कारखान्यांना (ऋणको) त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या रकमेनुसार एकूण रु.516.30 कोटी (रु.पाचशे सोळा कोटी ३० लाख फक्त) इतके अल्पमुदत कर्ज बँकांकडून (धनको) थकहमीद्वारे घेण्यास (व्याज अंतर्भूत करुन) व सदर थकहमीद्वारे घेतलेले कर्ज दि. 30 सप्टेंबर 2021 पूर्वी व्याजासह वसूल होईल या अटीवर मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन हमीची मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2021पर्यंत राहील.

त्या सहकारी साखर कारखान्यांची नावे व कर्जाची रक्कम अशी

अ.क्र.-साखर कारखान्याचे नाव-कर्जाची रक्कम(रु.कोटीत)

1) स.म.शं.कोल्हे स.सा.का.लि. , कोपरगाव,जि. अहमदनगर–18.22 कोटी

- Advertisment -

ताज्या बातम्या