Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यादहावी-बारावी परीक्षा घेण्यात अडचणी!

दहावी-बारावी परीक्षा घेण्यात अडचणी!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एक सत्र संपल्यानंतरही शाळा सुरू न झाल्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबतही पेच निर्माण झाला आहे.

- Advertisement -

दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा न घेता त्या पुढे ढकलता येतील का, याबाबत राज्य मंडळाची चाचपणी सुरू आहे.

दरवर्षीच्या नियोजित शैक्षणिक वेळापत्रकानुसार पहिल्या सत्राचा कालावधी संपत आला आहे. मात्र, अद्यापही प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नाहीत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी त्यालाही मर्यादा आहेत.

दरवर्षीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे आयोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ करते. या परीक्षांचे वेळापत्रक सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात जाहीर केले जाते.

मात्र, यंदा या परीक्षांबाबत पेच निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही.दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग विचार करत आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड़्यात किंवा डिसेंबरमध्ये शाळा सुरू होतील असे गृहीत धरले तरी त्यानंतर बारावीच्या परीक्षेसाठी अवघे दोन महिने, तर दहावीच्या परीक्षेसाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

राज्य मंडळाने सध्या अभ्यासक्रमातील 25 टक्के भारांश कमी केला आहे. मात्र, उर्वरित 75 टक्के अभ्यासक्रमाची तयारी दोन किंवा तीन महिन्यांत कशी करून घेणार, असा प्रश्न पडला आहे. शाळा सुरू झाल्याशिवाय विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे अर्ज घेणे आणि पुढील प्रक्रियेसाठीही कालावधी आवश्यक आहे. यंदा बारावीचा अभ्यासक्रम आणि प्रश्नत्रिकेचे स्वरूपही बदलले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या