Friday, May 3, 2024
Homeराजकीयअभिनेत्री 'खुशबू सुंदर' यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपात केला प्रवेश

अभिनेत्री ‘खुशबू सुंदर’ यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपात केला प्रवेश

दिल्ली | Delhi

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता खुशबू सुंदर यांनी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी दिली आहे. खुशबू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपला राजीनामा सुपुर्द केला. त्यांनी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

- Advertisement -

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती अशी खुशबू सुंदर यांची ओळख आहे. त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. खुशबू सुंदर या टीव्ही प्रेझेंटर देखील आहेत. अभिनयामध्ये अनेक टप्पे पार केल्यानंतर सन २०१० मध्ये खुशबू सुंदर यांनी राजकारणात पाऊल ठेवले.

खुशबू सुंदर यांनी सर्वप्रथम डीएमके (द्रविड मुन्नेत्र कळघम) पक्षात प्रवेश केला होता. त्या वेळी डीएमके पक्षाचे नेतृत्व एम. करुणानिधी यांच्या हाती होते. यानंतर सन २०१४ मध्ये खुशबू सुंदर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, २०१४ पासून त्यांचा काँग्रेसमध्ये सक्रीय सहभाग होता.मात्र, आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसंच तामिळनाडूमध्ये २०१२ च्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या