Friday, May 3, 2024
Homeधुळेआ.विनायक मेटेंनी केले मयत मोहन मराठे याच्या परिवारचे सांत्वन

आ.विनायक मेटेंनी केले मयत मोहन मराठे याच्या परिवारचे सांत्वन

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

शिवसंग्राम पक्षाचे आ. विनायक मेटे यांनी मयत मोहन मराठे याच्या मृत्यूचा आढावा घेतला. व मोहनच्या घरी जाऊन परिवारचे सांत्वन केले.

- Advertisement -

मोहन मराठे याचा मृत्यू म्हणजे पोलीसांनी केलेला खुनच असून या प्रकरणी सखोल माहिती गोळा करून संबंधितांवर 302 गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. विनायक मेटे यांनी केली आहे.

शिवाय मृत मोहन मराठे यांच्या कुटुंबायांना वैयक्तिक आर्थिक मदत दिली व दोंडाईचा शहर मराठा समाजातर्फे निवेदन देण्यात आले.

या दरम्यान धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, निंबा मराठे यांच्या शिष्टमंडळाने कै. मोहन मराठे यांच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी मनोज मोरे यांनी सांगितले की, मोहनच्या न्यायालयीन लढाईसाठी संघटनेच्या वतीने आर्थिक मदत केली जाईल. तसेच दोषींवर कारवाई झाली पाहिजे. चौकशी होईपर्यंत अज्ञातांवर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

त्यानंतर मयत तरुणाला न्याय मिळण्यासाठी पुढची दिशा कशी असावी यासाठी दोंडाईचा शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. बैठकीत पालकमंत्री अब्दुल सत्तर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची मागणी आ. मेटे यांनी केली.

याप्रसंगी माजी आमदार रामकृष्ण पाटील, जि. प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे, नंदुरबार जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील, भोईसरचे उद्योजक संतोष साळुंखे, देवा बोराने, विजय कदम, मराठा क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, सचिव निंबा मराठे, मुन्ना शितोळे, वीरेंद्र मोरे, समाधान शेलार, आबा कदम, उल्हास यादव, नाना मराठे, माजी नगरसेवक विजय मराठे, नगरसेवक छोटू मराठे, सागर मराठे, पत्रकार दिलीप शेळके, दिलीप जाधव, हरीष मराठे, नवनित शिंदे, नितीन जगताप, दीपक मराठे, संतोष मराठे, लोटन मराठे, अशोक मराठे, भैय्या मराठे, दिनेश मराठे, अभिजित मराठे, संजय मराठे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या