Friday, May 3, 2024
Homeनगरऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या एजन्सीला काम बंदचे आदेश

ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या एजन्सीला काम बंदचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या नगर येथील साई आनंद एजन्सीला अन्न व औषध प्रशासन विभागाने काम बंद करण्याचे आदेश देत,

- Advertisement -

कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या एजन्सीजसंदर्भात तक्रारी येत असल्याने त्याची दखल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नगर कार्यालयास कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नगर कार्यालयामार्फत मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणारी संस्था साई आनंद एजन्सी, स्वस्तिक चौक, नगर या पेढीची चौकशी केली असून त्याअनुषंगाने या पेढीस सहायक आयुक्त (औषधे) अशोक राठोड यांनी काम बंद करण्याचे आदेश दिले आहे.

तसेच कारणे दाखवा नोटीस बजावलेली असून याशिवाय, इतर मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या संस्थेस मेडिकल ऑक्सिजनची विक्री करतांना भारत सरकार रसायन व उर्वरक मंत्रालय, नवी दिल्ली यांचे 25 सप्टेंबर 2020 च्या पत्रकानुसार दर आकारण्याच्या सूचना केल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाई घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठा दराने आकारण्यात येणार्‍या किंमती बाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन, नगर कार्यालय या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन साहयक आयुक्त राठोड यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या