Friday, May 3, 2024
Homeनगरमयत सभासदांचे 16 लाखांचे कर्ज माफ

मयत सभासदांचे 16 लाखांचे कर्ज माफ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या मागील महिन्यांत झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मयत सभासदांच्या कर्जापैकी

- Advertisement -

1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. एकूण 17 सभासदांचे मिळून 16 लाख 10 हजार 500 रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. तसेच पांडुरंग वैराळ यांच्या दुर्धर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी 35 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष मुदगल म्हणाले, मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांची कामधेनू आहे. अडीअडचणीच्या काळामध्ये कर्मचार्‍यांना मदतीचा हात देण्याचे काम पतसंस्था करीत आहे. तसेच मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी व वैद्यकीय उपचारासाठी मदत करीत असते.

मयत सभासद शंकर भागानगरे, रघुनाथ घोरपडे, मच्छिंद्र शिंदे, संजय गायकवाड, राजश्री वाणे, भरत छजलानी, नामदेव गाडवे, सिमॉन कसबे, कैलास सातपुते, मधुकर शिंदे, वेणू साठे, संजय उमाप, संतोष घोरपडे, सतीश गांगुर्डे, सुरेश शिंदे, चंद्रकांत वाघमारे, लक्ष्मी नाथा शिंदे या मयत सभासदांनी घेतलेल्या कर्जापैकी सुमारे 1 लाख रुपयांची कर्जे माफ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष विकास गीते, संचालक जितेंद्र सारसर, सतीश ताठे, श्रीधर देशपांडे किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर,बाळासाहेब पवार, कैलास भोसले, प्रकाश आजबे, अजय कांबळे, नंदा भिंगारदिवे, चंद्रकला खलचे, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या