Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत आयोजित शॉर्टफिल्म फेस्टिवलचा निकाल जाहीर

देशदूत आयोजित शॉर्टफिल्म फेस्टिवलचा निकाल जाहीर

नाशिक | प्रतिनिधी

दैनिक देशदूत आयोजित शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये ओडीसा येथील शॉर्टफिल्म सिखाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. त्याखालोखाल इट मॅटर्सने दुसरा तर ब्रेक या शॉर्टफिल्मने तिसरा क्रमांक मिळवला. तसेच बदलाव आणि प्लेज्ड या शॉर्टफिल्म्सला उत्तेजनार्थ म्हणून निवडण्यात आले.

- Advertisement -

दैनिक देशदूतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यंदा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ५० सेकंदात ‘सामाजिक भान’ या विषयावरील शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक निर्मात्या आणि दिग्दर्शकांनी ५० सेकंदात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेते अरुण नलावडे, डॉ राजेश आहेर आणि देवेन कापडणीस यांनी काम पहिले. अवघ्या ५० सेकंदाच्या फिल्म्समध्ये सर्वाधिक काम करावे लागले होते. अनेकांनी हुशारीने विषयाला हाताळले. भारतीयांमध्ये सर्वकाही चांगले करून दाखविण्याची क्षमता आहे, तसेच दिग्दर्शकाने बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करणे महत्वाचे असल्याचे मत अभिनेते अरुण नलावडे यांनी मांडले.

फिल्म तयार करताना कशाप्रकारे काळजी घेतली जावी याबाबतचेही मार्गदर्शनदेखील परीक्षकांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक देशदूत आणि देशदूत टाईम्सच्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी केले. करोनाचे सावट असल्याने कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात पार पडला.

शॉर्टफिल्म फेस्टिवलच्या निमित्त विशेष व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पुरस्कार प्राप्त शॉर्टफिल्म्स

१. सिखा (प्रोड्युसर पंकजकुमार जेना, ओडीसा राज्य)

२. इट्स मॅटर (प्रोड्युसर नचिकेत कोळपकर, पुणे)

३. ब्रेक (प्रोड्युसर आकाश शिर्के, मुंबई)

4.बदलाव : (प्रोड्युसर, पोलीस अधिकारी डॉ रविंदर कुमार सिंगल, औरंगाबाद)

5. प्लेज्ड : (प्रोड्युसर, पलाश कडलग, नाशिक)

- Advertisment -

ताज्या बातम्या