Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशनाशकात मुसळधार : रस्ते जलमय

नाशकात मुसळधार : रस्ते जलमय

नाशिक |

नाशिकमध्ये रविवारी दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकाडाटांसह सुरु झालेल्या या पावसामुळे अवघ्या दहा मिनिटांत रस्ते जलमय झाले होते.

- Advertisement -

हवामान विभागाने १५ ऑक्टोंबरनंतर चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. पहिले तीन दिवस फारसा पाऊस झाला नसला तरी रविवारी दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी २ वाजता सुरु झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले. या पावसामुळे दुकानदार, व्यावसायिक व वाहनचालकांची तारांबळ उडाली.

दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहर व उपनगरिय परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागांसह सिडको, सातपूर, आडगाव या ठिकाणी कोसळधार पहायला मिळाली. अचानक झालेल्या धुवाधार पावसाने नागरिकांची तारांबळ झाली. अर्धा तासाच्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते. वाहनचालकांना वाहने थांबवून अडोशाच्या आधार घ्यावा लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या