Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशलॉकडाऊन संपला, करोना नाही

लॉकडाऊन संपला, करोना नाही

नवी दिल्ली

देशात करोनाच्या लसीवर काम सुरु आहे. ही लस प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचण्यासाठी नियोजन केले जात आहे. यामुळे लस येत नाही तोवर आपल्याला करोनाशी युद्ध सुरुच ठेवायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी राष्ट्राला संबोधित करताना सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधानांनी संध्याकाळी सहा वाजता १२ मिनिटांचा संवाद देशवासीयांशी साधला. ते म्हणाले, करोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे. आता सण येणार आहे. यामुळे या सगळ्यात कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकते. सावधगिरी बाळगून सगळे सण साजरे करा.

modi live : लॉक़डाऊन संपला, व्हायरस नाही

करोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाउन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरु नका. भारताने आपली स्थिती सावरली आहे ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे.

आज आपल्या देशात करोना रुग्णांनासाठी ९० लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. देशातल्या चाचण्यांची संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल. करोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणं ही आपली ताकद आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या