Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारठिबक सिंचनचा पैसा शासनाकडे अडकला

ठिबक सिंचनचा पैसा शासनाकडे अडकला

बोरद – Borad – वार्ताहर :

तळोदा तालुक्यातील ठिबक सिंचन केलेल्या शेतकर्‍यांचा मोठया प्रमाणावर जमा केलेला पैसा शासनाकडे अडकल्याने शेतकर्‍यांची कोंडी झाली आहे.

शासनाकडे ठिबक अनुदानाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. ज्या पद्धतीने फंड उपलब्ध होईल त्या पद्धतीने शेतकर्‍यांना वितरित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

-नरेंद्र महाले- तालुका कृषी अधिकारी, तळोदा

तळोदा तालुक्यातील जमिनीची खोलवर गेलेली पाणीपातळी यासह अन्य कारणांमुळे शेतकर्‍यांचा कल ठिबक सिंचनाकडे वाढू लागला आहे.

ठिबक सिंचनाचे प्रस्ताव जमा करतेवेळी शेतकर्‍यांना शासनाच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर शासनाकडून प्रस्ताव मंजूर होऊन आल्यावर अनुदानित रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत असते.

तालुक्यातील खुला प्रवर्गातील उर्वरित 171 शेतकर्‍यांना अनुदानाची प्रतिक्षा आहे. देश कोरोनाच्या महामारीत सावरण्याचा प्रयत्नात असला तरी, शेतकर्‍यांना पैशांची नितांत गरज आहे.

बदलते हवामान व अतिवृष्टीसदृश परिस्थितीला तोड देत, शेतकरीला पुढील हंगाम घेण्यासाठी पैशांची चण-चण भासत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यार्नें तळोदा तालुक्यातील शेतकर्‍यांना प्रस्तावीत अनुदानाची रक्कम अदा करण्यासाठी साधारण दीड कोटी रक्कमेची आवश्यकता आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांचे करोडो रुपये शासनाकडे अडकलेले असल्याने शेतकर्‍यांची कोंडी होतांना दिसून येत आहे.

सदर अनुदान न मिळाल्यास, शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लवकरात लवकर अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तसेच हिवाळ्यात केळी व ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते, त्यामुळे ठिबक सिंचनाचे नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांमार्फत केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या