Friday, May 3, 2024
Homeनाशिकमाजी आमदार निशिगंधा मोगल यांचा सत्कार

माजी आमदार निशिगंधा मोगल यांचा सत्कार

नाशिक । प्रतिनिधी

सैनिकांच्या कल्याणासाठी वीस लाखांचे स्त्रीधन अर्पण करून आपल्या दातृत्वाचा इतरांपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या माजी आमदार निशीगंधा मोगल यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्य प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांनी केले.

- Advertisement -

गंगापूर रोडवरील सावरकर नगरवासियांतर्फे निशिगंधा मोगल यांचा डॉ. भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सावरकरनगर परिसराच्या विकासासाठी मोगल परिवाराचे योगदान मोलाचे आहे.

यावेळी विविध वक्तयांनी आपल्या भाषणातून निशिगंधा मोगल यांच्या जीवनपटाचे विविध पैलू उलगडून दाखवले. आमदार म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय तर आहेच परंतु त्या सतत कोणाच्याही मदतीला धाऊन जात असत.

आमदार झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवीही मिळवली होती याची आठवणही यावेळी करून देण्यात आली. कारगीलला गेल्यानंतर सैनिक ऊन,पाऊस, वारा याची तमा न बाळगता देशाचे संरक्षण कशा पद्धतीने करतात हे ते नेहमी सांगतात. त्यांचे कार्य उल्लेखनिय असल्याचे उदगार नागरिकांनी काढले.

- Advertisment -

ताज्या बातम्या