Sunday, May 5, 2024
Homeनगरअवैध दारू विक्री करणार्‍या दोन हॉटेलवर छापा

अवैध दारू विक्री करणार्‍या दोन हॉटेलवर छापा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहातील दोन हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी छापा टाकला असता

- Advertisement -

त्याठिकाणाहून दोघा जणांना ताब्यात घेऊन 22 हजार 884 रुपये किंमतीची विदेशी दारूजप्त केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरवाडे, बहाकर, जोसेफ साळवी, पोलीस नाईक शेख, सोमनाथ गाडेकर, गणेश ठोकळ, प्रशांत बारसे, अमोल गायकवाड, शरद अहिरे, किशोर जाधव, महेंद्र पवार, पंकज गोसावी या पोलीस पथकाने या दोन्ही हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली.

श्रीरामपूर शहरातील बोरावके नगर, वॉर्ड नं. 7, येथील सिल्व्हर स्पून या हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती कळाल्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांनी त्या ठिकाणाहून 20 हजार 184 रुपयांची विदेशी दारू जप्त केली असून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 2151/2020 प्रमाणे दोघा जणांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई पमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच संगमनेर-नेवासा रोडवर असलेल्या हॉटेल नितु येथे अवैध दारू विक्री होत असल्याच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असून पोलिसांनी त्या ठिकाणाहून 2700 रुपये किंमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी या ठिकाणाहून एकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या