Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात ९१ हजार रूग्ण करोनामुक्त; वाचा सध्याची परिस्थिती

नाशिक जिल्ह्यात ९१ हजार रूग्ण करोनामुक्त; वाचा सध्याची परिस्थिती

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत असला तरीदेखील अजूनही धोका कायम आहे. मागील चोवीस तासात केवळ 325 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 322 रूग्णांनी करोनावर मात केली आहे…

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यात करोनामुक्तीचा आकडा 91 हजार 743 वर गेला आहे. हे प्रमाण 95.30 टक्के इतके आहे. परंतु नव्याने दाखल होणार्‍या रूग्णांमध्ये काहीशी वाढ झाली असून दिवसभरात 954 रूग्ण दाखल झाले आहेत.

मागील महिनाभरापासून जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येणारांची संख्या घटत चालली आहे. तर करोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात केवळ 325 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 173 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 63 हजार 666 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 130 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 27 हजार 643 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 5 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर जिल्हाबाह्य दोन आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 4 हजार 212 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 748 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 322 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 91 हजार 743 झाला आहे.

करोनामृत्यूमध्येही मोठी घट झाली असून आज दिवसभरात 4 रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 नाशिक शहरतील तर 3 रूग्ण ग्रामिण भागातील आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 715 झाली आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा घटत चालला आहे. दिवसभरात 954 नवे संशयित दाखल झाले आहेत. ही धोक्याची घंटी असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात होणार्‍या गर्दीमुळे हा आकडा वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण कोरोना बाधित : 96,269

नाशिक : 63,666

मालेगाव : 4,212

उर्वरित जिल्हा : 27,643

जिल्हा बाह्य ः 748

एकूण मृत्यू: 1,715

करोनमुक्त : 91,743

- Advertisment -

ताज्या बातम्या