Friday, May 3, 2024
HomeUncategorizedदिवाळी अंक २०२० कविता : काजळ

दिवाळी अंक २०२० कविता : काजळ

झोपेच्याही डोळ्यांमध्ये भरले काजळ

स्वप्नामध्ये दिसली मजला सुंदर हिरवळ

- Advertisement -

केसांमध्ये तिच्या माळता गजरा म्हटला…

झोपेच्याही डोळ्यांमध्ये भरले काजळ

स्वप्नामध्ये दिसली मजला सुंदर हिरवळ

केसांमध्ये तिच्या माळता गजरा म्हटला

माझ्याहुनही नात्यामधला मोहक दरवळ

आवडणारी मुलगी नकळत जवळून गेली

विसावले ना मनातले हे अजुनी वादळ

पाऊस म्हणजे असे दिवाळी मातीसाठी

नेसून नटते गवतफुलांचे नवीन पातळ

ठाऊक नाही तिला कधीही मरगळ बिरगळ

देह तिचा हा झर्‍यासारखा नुसता खळखळ

चंद्र आजला लवकर आला दारावरती

सूर्या तूही आज जरासा लवकर मावळ

माझ्यावरल्या डागांचिच रे झाली चर्चा…

दृष्टी नव्हती बघणार्‍यांची कधीच निर्मळ

खरी माणसे शोधायाला आत शिरूया

फोडल्याविना उमगत नाही कुणास नारळ

-प्रशांत केंदळे(8087172241)

- Advertisment -

ताज्या बातम्या