Sunday, May 5, 2024
Homeधुळेदोंडाईचात ॲड. भावसार यांच्या कार्यालयाची तोडफोड

दोंडाईचात ॲड. भावसार यांच्या कार्यालयाची तोडफोड

दोंडाईचा । श. प्र.

येथील राष्ट्रवादीचे ॲड. एकनाथ भावसार यांच्या ऑफिस मध्ये माथेफिरुने तोडफोड केली. हातात कोयता घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

या घटनेत मध्यस्थी करणारा एका पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सकाळी 10 वाजेच्या सुमारास हो घटना घडली. त्यावेळी ॲड. भावसार हे बाजूच्या कार्यालयात असल्याने बचावले. हल्लेखोर माथेफिरू याने या पूर्वी ही शहरातील एका कार्यालयावर हल्ला केल्याने तो कोठडीत होता.

नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली. त्याने आज केलेल्या हल्ल्या नंतर पोलिसांनी त्यास परत ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती ॲड. भावसार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळविली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या