Friday, May 3, 2024
Homeधुळेघरफोडी, दुचाकी चोरीचे सत्र सुरुच

घरफोडी, दुचाकी चोरीचे सत्र सुरुच

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील चितोड रोडवरील महेश्वर नगरात व्यापार्‍याचे घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

- Advertisement -

तर शहरातील वलवाडी शिवारातील अभिरुची अपार्टमेंटच्या पार्कींगमधून बुलेटसह दोन दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेल्या. याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चोरटे शहरात सक्रीय झाले असून चोरट्यांनी पोलिस निरीक्षकाचे घर देखील फोडले. याबाबत पोलिस दप्तरी नोंद होते परंतू चोरटे हाती लागत नाही. यामुळे चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

महेश्वर नगरात घरफोडी

शहरातील चितोड रोडवरील महेश्वर नगरात व्यापार्‍याचे घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे.

चितोड रोडवरील खंडेराव सोसायटीच्या मागील बाजूस महेश्वर नगर असून येथे मालराम देवराम चव्हाण हे स्टील व्यापारी राहतात.

गेल्या आठ दिवसांपासून चव्हाण परिवार हे गुजरात राज्यातील सुरत येथे गेले होते. त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातून सात ग्राम सोने आणि एक लाख रुपये रोख असा मुद्देमाल चोरुन नेला.

आज शनिवारी सकाळी मालराम चव्हाण यांचे शालक समाधान हिरे हे त्यांच्या घरी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात ही माहिती देेण्यात आला. मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. श्वान पथकाला बोलविण्यात आले. श्वानला माग गवसला नाही.

दुचारी चोरी

शहरातील वलवाडी शिवारातील अभिरुची अपार्टमेंटच्या पार्कींगमधून बुलेटसह दोन दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेल्याचे आज सकाळी उघडकीस आले.

अभिरुची अपार्टमेंटमध्ये राहणारे श्रावणअण्णा खैरनार यांच्या मालकीच्या या दोन्ही मोटार सायकली होत्या.

मध्यरात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये असलेल्या पार्कींगमधून साखळी बांधून कुलूप लावून एमएच 18 एएफ 7003 क्रमांकाची अ‍ॅक्टीव्हा आणि ग्रीन कलरची बुलेट (क्र. एमएससी 300) या दोन्ही दुचाकी कुलूप तोडून चोरट्यांनी चोरुन नेल्या.

या दोन्ही दुचाकीची किंमत लाखो रुपये आहेत. याबाबत श्रावण खैरनार यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरुन भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या